आमचा देवा धर्माला विरोध नाही.

बातम्या

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी 'त्या' मुलीची मागणी

मोरगाव/वडगाव : Lokmat : First Published :26-May-2016 : 20:52:13
Date : Thursday, May.26,2016.

मोरगाव/वडगाव निंबाळकर, दि. 26-  दौंड तालुक्यात काही दिवसांपूर्वी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घडलेल्या पूजेच्या अघोरी प्रकारानंतर आता बारामती तालुक्यातील तरडोलीनजीक घायगुडेवस्तीतील त्या अल्पवयीन मुलीची मागणी याच कारणासाठी होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी अखेर तीन दिवसांनी जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत सहा जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अजूनही इतरांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, अद्याप मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नाना मारुती कोळेकर (रा. मासाळवाडी, ता. बारामती), दिगंबर बापूराव भापकर, महदेव बाजीराव भापकर, भाऊसाहेब गेणबा सोनवलकर (तिघेही रा. लोणी भापकर, ता. बारामती), पोपट शिवराम नाळे (रा. दुधेबावी, ता. फलटण, जि. सातारा), विकास दादाराम मोहिते (रा. केंजळ, ता. वाई, जि. सातारा) यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

साधारण दीड महिन्यापूर्वी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाना कोळेकर व दिगंबर भापकर हे फिर्यादीच्या घरी आले होते. कोळेकर याने दिगंबर याला, ह्य६ फुटांपेक्षा जास्त उंचीची मुलगी पूजा करण्यासाठी एका दिवसासाठी पाहिजे आहे. याबदल्यात सात ते आठ तोळे सोने मुलीला पूजेमधे घालतो, ते मुलीला मिळेल. तुला दोन लाख देतो,ह्ण असे कबूल केले. यानंतर कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने आरोपी पुन्हा मुलीच्या मामाकडे गेले. ह्यतुझी भाची पूजेसाठी दे. त्यासाठी मुलीला ७-८ तोळे सोने देतो, ७ ते ८ लाख रुपये रोख देतो,ह्ण अशी आॅफर दिली. मामाने मुलीच्या वडिलांकडे जाऊन याबाबत विचारणा केली. इतर नातेवाइकांना ही बाब कळविण्यात आली. पैसे देऊन काय अघोरी पूजा करणार काय? या भीतीने मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे चौकशीची तक्रार केली.

पोलिसांनी चौकशीसाठी पहिल्या चार जणांना बोलावले. त्यांच्याकडून नाळे व मोहिते यांची नावे पुढे आली. त्यांच्याच सांगण्यावरून वरील चौघांनी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. सहा जणांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३चे कलम २ (१) ख २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरचे पोलीस निरीक्षक विजय जाधव गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

दरम्यान, तीन दिवसांपासून या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता; त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू होती. गुरुवारी (दि. २६) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, जिल्हा सचिव भारत विठ्ठलदास, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण भापकर, नेताजी खंडागळे सकाळीच फिर्यादीच्या कुटुंबीयांना भेटून पोलीस ठाण्यामधे आले होते. या घटनेबाबत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबतचे निवेदन पोलिसांकडे देण्यात आले. अंनिसचे कार्यकर्ते, पत्रकार, नागरिकांचे मत जाणून घेऊन अखेर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.

 

 

सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले

आरोपींनी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी मुलीची मागणी केली होती. अल्पवयीन मुलीला पूजेसाठी वडिलांनी बसवण्यास संमती दिल्यानंतर नरबळीचा धोका होता. मात्र, मुलीचे काका भगवान धायगुडे यांच्या सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले. आरोपींना ताब्यात घेतले असल्याने त्यांनी यापूर्वी नरबळीसारख्या घटना केलेल्या असल्यास उघड होण्याची शक्यता आहे.