आमचा देवा धर्माला विरोध नाही.

वर्तमानपत्र बातम्या

नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने नोंदवला आक्षेप

Date : Saturday, Oct.15,2016.

रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आज नाणीज येथे होणाऱ्या मरणोत्तर देहदान संकल्पपूर्ती करणाऱ्या दात्यांचा जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत. नरेंद्र महाराजांच्या जन्मोत्सव कार्यक्रमाचा आरंभ शनिवार पासून होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. मुख्यमंत्र्यांसहित मान्यवरांच्या उपस्थितीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यावर आपला आक्षेप नोंदवला असून त्याबाबतचे लेखी निवेदन राज्य कार्यध्यक्ष अविनाश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे देखील या कार्यक्रमास उपस्थित रहाणार असे बोलले जात होते. यामुळे असाच आक्षेप नोंदवणारे पत्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने माननीय पंतप्रधानांना देखील देण्यात आले होते. या पत्राची एक प्रत देखील मुख्यमंत्र्यांच्या निवेदनासोबत अंधश्रध्दा निर्मुलन समितीने जोडली आहे.

मानिय मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे असे म्हणणे आहे कि अवयव दान व रक्तदान या समाजपयोगी उपक्रमांचे उद्घाटन आणि संकल्प वितरण आपल्या हस्ते होणार आहे हि आनंदाची बाब आहे. परंतु मागील २० वर्षांपासून नाणीज संस्थानच्या नावे अनेक प्रकारच्या चमत्कारांचा दावा करणारे, तशी पुस्तके ‘नरेंद्र लीलामृत’ नावाने प्रकाशित करणारे त्यांच्या सदर अवैज्ञानिक दाव्यांना विरोध केला, त्याविषयी प्रश्न विचारले म्हणून आपल्या अनुयायानाही मारहाण करणारे, शिवीगाळ करणारे, स्वयंघोषित जगतगुरू म्हणवून घेणारे नरेंद्र महाराज आपल्या मान्यता वाढीसाठी आता अध्यात्मिक संप्रदायाच्या नावे सेवाभावी कामाचा देखावा करीत आहेत. अशा कार्यक्रमांना आपल्यासारख्या जबाबदारी असणाऱ्यांना बोलावून स्वतःभोवती कवचकुंडले निर्माण करीत आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून भारतीय संविधानाच्या नागरिकत्वाच्या कर्तव्यांचा भाग असलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोनाशी पूर्णपणे विसंगत दावे, वर्तनाचे आपण समर्थन करणे अपेक्षित नाही, कारण ती आपली घटनात्मक जबाबदारी आहे असे आक्षेप नोंदवणारे पत्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

अधिक माहितीसाठी येथे click करा 

.... अधिक बातम्यासाठी