आमचा देवा धर्माला विरोध नाही.

वर्तमानपत्र बातम्या

अ.भा.अनिंसची जिल्हास्तरीय बैठक, महानगर, तालुका, युवा कार्यकारणी गठीत सकाळ वृत्तसेवा

Date : Saturday, Jun.17,2017.

संवादातून साधणार अंधश्रध्देवर घाला
अ.भा.अनिंसची जिल्हास्तरीय बैठक, महानगर, तालुका, युवा कार्यकारणी गठीत
सकाळ वृत्तसेवा
अकाेला, ता. १७ ः श्रध्दा व अंधश्रध्दा यामध्ये पुसटशी रेषा असुन माणसांच्या मेंदूच्या मुक्तीचे कार्ये अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समीती सातत्याने करत आहे. समाजामध्ये असलेल्या अनिष्ठ रूढी पंरपरावर मात करण्यासाठी संवाद माध्यमाचा वापर केला जाणार आहे. यासाठी माेठ्या प्रमाणावर जनजागरण करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रवक्ते पुरूषाेत्तम आवारे पाटील यांनी सांगितले.
शनिवारी (ता.१७) येथील शासकीय विश्रामगृहावर आयाेजित बैठकीदरम्यान ते कार्यकर्त्यांशी बाेलत हाेते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख शरद वानखडे, वाशीम संपर्क प्रमुख प्रा. स्वप्ना लांडे-साकारकर, बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख अशोक घाटे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कर्मकांड, अंधश्रध्दा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संघटनात्मक बांधणी, स्वतःला गुणदोष मुक्त करणे,आदीसह अंधश्रध्दा विषयाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच अकोला महानगर, तालुका कार्यकारिणी, युवा अंनिस, महिला आघाडी गठीत करण्यात आली असून महाविद्यालयात अंनिस विवेक कट्टा तयार करण्यात येणार आहे. तशाप्रकारचे ध्येय धोरणे निश्चित करण्यात येणार आहेत. याप्रसंगी धनंजय मिश्रा, डॉ. निलेश पाटील, संतोषकुमार ताले पाटील, योगेश बकाल, शिवाजी भोसले, पराग गवई, माणिक शेळके, विठ्ठल तायडे, श्याम देशमुख, योगेश बकाल, धर्मदिन इंगळे, अजय सिरसाट, अविनाश राऊत, संध्या देशमुख, अश्विनी देशमुख, रिया उगवेकर, रोहित हिवरकर, परमेश्वर पवार उपस्थित हाेते.
महानगर, तालुका, युवा कार्यकारणी गठीत
यावेळी तीन महत्वाच्या कार्यकारीणी गठीत करण्यात अाल्या. यामध्ये महानगर कार्यकारणीच्या संघटकपदी चंद्रकात झटाले, उपाध्यक्ष डिगांबर सांगळे, सचिव मंगेश वानखडे, कोषाध्यक्ष विजय बुरकले, प्रसिध्दीप्रमुख भरत इंगोले तर महिला संघटक म्हणून तनुश्री भोसले, सचिव आशा उगवेकर यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रेमदास राठाेड, अश्विनी देशमुख, निशिकांत बडगे, अ‍ॅड. शेषराव सांगळे, विठ्ठल तायडे, धर्मदिप इंगळे, संध्या देशमुख यांची निवड करण्यात आली. तसेच युवा अनिंसच्या संघटकपदी योगेश फरपट, सचिव विकास मस्के, कोषाध्यक्ष हरीष आवारे, प्रसिध्दी प्रमुख रोहित हिवरकर, अकोला तालुका संघटकपदी हितेश जामनिक, सचिव शुध्दोधन वानखडे यांची निवड करण्यात आली आहे.

.... अधिक बातम्यासाठी