अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य संत वचनांवर आधारित

महाराष्ट्राला श्रेष्ठ अशी संत परंपरा आहे.या संतांनी जनजागरण करून आणि अनिष्ठ रुढी प्रथांवर वार करून केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला सुध्दा मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. संताच्या याच कार्यावर आणि वचनांवरच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य गेल्या 35 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे, असे प्रतिपादन समितीचे मराठवाडा प्रमुख तथा हिप्नोथेरपिस्ट किशोर वाघ यांनी केले.
            अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जालना जिल्हास्तरीय चमत्कार प्रात्यक्षिके व सहविचार सभेत अध्यक्ष पदावरून वाघ बोलत होते. स्थानिक विश्राम गृहात आयोजित कार्यक्रमातील पहिल्या सत्रात यवतमाळ जिल्हा संघटक उमेश इंगोले यांनी समितीचा देवाधर्मा ला विरोध नसून त्याच्या नावावर लुबाडणूक करणार्‍यांना आहे .त्यासाठी शाळा महाविद्यालयात सचमत्कार व्याखाने, जिल्हाभरात प्रशिक्षण शिबिरे सातत्याने घेणे गरजेचं असल्याचे सांगितले.त्या नंतर संघटन बांधणी करण्यात आली . यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांचे किशोर वाघ यांनी निरसन केले.
        वैज्ञानिक चमत्कार प्रात्यक्षिके सत्रात बुलढाणा जिल्हा संघटक दत्ताभाऊ सिरसाट यांनी जळता कापुर खाणे , कर्णपिच्छाच,हवेतून विभूति,चैन काढणे ई . प्रयोग सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा संगितली . यावेळी आठही तालुक्यातून कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने व उत्साहाने उपस्थित होते.                                       पहिल्याच सभेला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे बैठक व्यवस्था अपूर्ण पडली.
पूर्णा सभागृहात शेवटी लोकांनी खुर्च्या बाजूला करून खाली बसून तीनही सत्रात सहभागी झालेत.                 
         या हाऊसफुल्ल यशस्वी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालना जिल्हा संघटक सुनील वाघ तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव भारत सिरसाट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विष्णु जायभाये ,डॉ.सचिन घुगे,प्रा. एकनाथ शिंदे , गोविंद जाधव,राम गोरे , संतोष नागरे,मिलिंद सावंग,अनिल ढवळे , सदाशिव भुतेकर,उज्वल गवई,लक्ष्मन गोडसे,राजू मगर, शरद दांडगे, सुभाष काकडे, सुनील डुकरे,  यांनी परिश्रम घेतलेत.

aaaa