प्रा. श्याम मानव

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती १९८२ पासून संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, छतत्तिगड, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान इ. प्रदेशात जनप्रबोधनाचे कार्य सातत्याने करीत आहे. याच माध्यमातून समितीने आजवर शकुंतला देवी, पायलट बाबा, कृपालु महाराज, ‘बोलका पत्थर’ पटवर्धन, मारेस सेरेल्लो, बेबी राठोड, गुलाब बाबा, शेळके बाबा, रज्जाक बाबा, मोईनधीन शामसुधीन कादरी, र्रोफ बाबा, विदेशी पादी, संदरदास महाराज, नैनोदचा बाबा, आनंदी माता, परी अम्मा यासह हजारो बुवा-बाबा, मांत्रिक, भगत, ज्योतिष्यी यांचा जाहीर भंडाफोड करून त्यांचं पितळ जनतेसमोर  उघड  केलं आहे.

महाराष्ट्राला संत आणि समाज सुधारकांची एक परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत कबीर, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांचे सह ज्योतिबा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि.दा.सावरकर, आगरकर या समाजसुधारकांनी त त्कालीन समाजातील घातक रुढी, अंधश्रध्दा यांना विरोध करून निकोप समाज निर्मितीचा प्रयत्न केला. हेच विचार लोकांपुढे मांडण्याचे काम समिती सातत्यानं करीत आहे.

aaaa