देव ध्रर्म विषयक भूमिका अंतिमतः मान्य !

आता ज्या भूमिकेसाठी अंधश्रध्दा निर्मूलन समितीची स्थापना झाली, त्याच समितीत सामील व्हायचे व नंतर मूळ भूमिकेचीच पुन्हा चिकित्सा करावी व पुन्हा निर्णय घ्या म्हणायचे हा प्रकारच मुळात अनैतिक होता. तरीही आम्ही या गोष्टीस मान्यता दिली व १९८७ साली लोणावळ्याला चळवळीच्या सक्रीय कार्यकर्त्याचे एक शिबीर बोलावले. या शिबिरात पुन्हा पुन्हा एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी देवधर्माची चिकित्सा करण्याचा अधिकार अंनिसच्या मंचावरुन असावा असा सूर लावून धरला. त्यावेळी विविध संघटनांशी संबंधित असलेल्या व कोणत्याही संस्थेशी बांधिलकी नसलेल्या सा-याच कार्यकर्त्यानी ही मागणी फेटाळून लावली, \'देवाला व धर्माला आमचा विरोध नाही\' ही भूमिका कायम ठेवूनच आम्ही अंधश्रध्दा निर्मूलन चळवळ चालवीत आलोय, या पुढेही चालवू, असा निर्णय अंतिमतः मान्य झाला. तीन विरुध्द बाकी सगळे अशी त्यावेळी स्थिती होती. एवढेच नव्हे तर अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुन्हा या वादात शिरणार नाही असेही यावेळी ठरले. देवाधर्मावर हल्ला केल्याशिवाय अंधश्रध्दा निर्मूलन करणेच शक्य नसेल असे ज्यांना वाटते, त्यांनी वेगळ्या बॅनरखाली जाऊन काम करावे, असेही अनेक कार्यकर्त्यानी ठणकावून सांगितले.

aaaa